Posts

Showing posts from September, 2010

गणपतीची मुलगी

गणपती यायला फ़क्त दोन दिवस राहिलेत आणि आमच्या दादरची प्रत्तेक गल्लीनगल्ली माणसानी फुलून गेलीय. सगळ्यांचे डोळे बाप्पाच्या आगमनाकडे लागलेत. लहानांपासून थोरान्पर्यंत सगळयानाच बाप्पाने वेड लावलय. त्यातलीच एक आमची टीना, वय वर्षे ५. लहानपणा पासूनच ती गणपतीची जबरदस्त fan आहे. गणपती या विषयावर ती दिवसभर चित्र काढू शकते. (लहान असताना मी कधीच व्यक्तिचित्रांच्या वाटेला गेले नाही.....कारण नाक तोंड डोळे काढणे ही अपने बस की बात नहीं थी) हल्लीची मुलं उपजतच हुशार आणि चिकित्सक असतात, आपल्याला अजुनही न पडलेले प्रश्न त्यांना लहानपणीच पडतात याचा प्रत्यय मला हल्लीच आला. टीनाने काढलेल्या असंख्य गणपतीच्या चित्रान्पैकी ते एक चित्र होतं. पण यात गणपती बरोबर एक मुलगीही होती. न राहवून आईने तिला विचारलं आज गणपतीच्या बाजूला तुझही चित्र काढलं का? त्यावर बाईसाहेब उत्तरल्या "हा गणपती आणि ही गणपतीची मुलगी" ......उत्तर ऐकून आम्ही थक्कच झालो. गणपतीला कधी मुलागिही असू शकते याचा विचार आमच्या गेल्या सात पीढयानमध्ये कोणी केला नसेल :) काय भन्नाट डोकी असतात आजकालच्या मुलांची! बहिण तर बहिण भाऊतर त्याहून एक पाऊल ...