गणपतींचे काही नवीन प्रकार
वेळ बदलली काळ बदलला तसे गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलले. १० वर्षांपूर्वीचे गणपती आणि आताचे गणपती यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. अर्थात गणपती नाही बदलले माणसं मात्र बदलली. माणसांनी गणेशोत्सवाचं स्वरूपही बदललं. पूर्वी दूरवर एखाद्या गल्लीत सार्वजनिक गणपती असायचा. आजकाल गल्लोगल्ली असतात. घरगुती गणपतीही आजच्या एवढे नक्कीच नव्हते. माझ्या पाहण्यात आलेले हे काही गणपतीचे विशेष प्रकार: १. पारंपारिक गणपती: वंश-परंपरेनुसार चालत आलेला हा गणपतीचा प्रकार. यामध्ये वडलोपार्जित गणपती पूजला जातो. इथे सजावटीला विशेष महत्व दिलं जात नाही मात्र गणपती घरी असेपर्यंत त्याची पूजाअर्चा विधिवत कशी होईल यावर जास्त भर दिला जातो. प्रसाद म्हणून जास्तीत जास्त लोक जेवून किवा तृप्त होवून कसे जातील यावर विशेष लक्ष दिलं जातं. २. पारंपारिक गणपती मध्यमवर्गीयांचे: यामध्ये सजावटीला विशेष महत्व दिलं जात. थर्माकोल, लाईट्स, फुलं decoration साठी वापरली जातात. पूजा १००% विधीवतच झाली पाहिजे असा यांचा अट्टाहास नसतो. आपल्याला जमेल, वेळ मिळेल तशी पूजा-अर्चा पाहिली जाते. घरी आलेल्या पाहुण्यांचे चहा, सरबत, चिवडा, लाडू वा इतर फराळ देव...