दिवाळी पहाट: काल आणि आज
हल्लीच वाचनात एक कविता आली "आता दिवाळी पहाट पूर्वी सारखी रंगत नाही". खरच दिवाळी पहाट आता पूर्वी सारखी रंगत नाही. कितीही ओढून ताणून तो माहोल क्रिएट करायचा प्रयत्न केला तरी ती मजा आता नाही.... तसं बघायला गेलं तर पूर्वी पेक्षा झगमगाटाची, साज-सजावटीची साधनं जरी वाढली असली तरी त्या साधेपणामध्ये जी पारंपारिकता ठासून भरली होती ती आता नाही. पूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहिलं कोण उठणार यावरून आम्हा लहान मुलांमध्ये स्पर्धा लागलेली असायची. जो पहिला उठणार तो दुसऱ्याच्या दारात फटाक्याची माळ लावणार. पहाट उगवायची ती आमच्या दारात लावलेल्या फटाक्यांच्या आवाजानेच. बाहेर मिट्ट काळोख असायचा पण अक्खी गल्ली कंदिलाच्या प्रकाशात न्हाहून निघालेली असायची. दिवाळीची खरी मजा असायची ती सकाळी सकळी नवीन कपडे घालण्यात. तेव्हा फक्त वाढदिवस, दिवाळी, गणपतीलाच कपड्यांची खरेदी केली जायची. आता दर वीकेंडला Shopping केली जाते, कपड्यांची गरज असली नसली तरी. आता दिवाळी म्हणजे एक event असतो. ज्यात फक्त presentation महत्वाच असतं, खरी दिवाळी तर त्यातून कधीच हद्दपार झालेली असते. आता दिवाळी म्हणजे महागडे कपडे, विकतच...