योगा योग!
व्यायाम हि गोष्ट आळशी लोकांसाठी बनलेली नाही. मुळात करावाच कशाला तो व्यायाम! ऑफिस मध्ये काम करताना, ट्रेन ने प्रवास करताना, बस पकडताना, स्टेशन वरचे ब्रिज चढताना उतरताना कमी का होतो व्यायाम. मग कशाला हलवा ते हात पाय उगाचच? छे छे तो आपला प्रांत नाही! कधी तरी uneasy वाटलं तर शतपावली करण्यापर्यंत ती आमची मजल...त्या पलीकडे जावून माझा कधी "योगाशी" संबंध येईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. माझ्या एका मैत्रिणी ने योगाचे क्लासेस केले होते. तेव्हा पासून ती मागे लागली होती तूही कर तूलाही छान वाटेल. फार हातपाय मारायला नाही लागत बसल्या बसल्याहि तू करू शकतेस.. वगैरे वगैरे पण आवडच नसल्यामुळे सवड काढण्याचा प्रश्नच नव्हता. वर्षातून एकदा ते क्लासेस आमच्या इथे होतात. दुसर्या वर्षीही जेव्हा त्या क्लासेस ची जाहिरात आली, madam पुन्हा मागे लागल्या..हवं तर मी तुझे पैसे भरते..वाढदिवसाचं गिफ्ट समज वगैरे वगैरे .....आता आढेवेढे घेवून ती ऐकणारी नव्हती म्हणून या वेळी हि भानगड काय आहे ते म्हटलं पाहूनच यावं एकदा. जीवावर उदार होवून सकाळी ७.३० च सेशन अटेंड करायचं ठरवलं. रविवारची सकाळ होती ख...