आनंदाचं झाड
दिवाळी झाली कि चाहूल लागते ती ख्रिसमसची. ख्रिसमस म्हणजे नवीन वर्षाची चाहूल अन नवं वर्ष म्हणजे पुन्हा सगळ्या सणांची नांदी. ग्लोबलायझेशनला सणवारही अपवाद राहिलेले नाहीत ते हि आजकाल ग्लोबल झालेत. आनंद साजरा करायला माणसाला आजकाल कुठलही निमित्त पुरतं मग ते जोशी आणि दांडेकरांनी आणलेला ख्रिसमस ट्री असो वा खानांनी आणलेला गणपती. आनंद हा फक्त आनंद असतो. असो! तर हे ख्रिसमस ट्री ... नाही.. आनंदाचं झाड आमच्याकडे हळूहळू कसं रुजत गेलं ते कळलंच नाही. लहान असताना ख्रिसमस ट्री फक्त मी चर्चमध्ये किवा क्रिश्चन लोकांच्या घरी पहिले होते. ते इतके देखणे दिसायचे कि ते आपल्याघरीहि असावे असं मनापासून वाटायचं. म्हणूनच शाळेत असताना बोट भर लांबीचे चकचकीत ख्रिसमस ट्री मी दर ख्रिसमसला शोकेसमध्ये आणून ठेवायचे नंतर पुढे कॉलेज मध्ये असताना त्याची लांबी अर्धा फुटांवर गेली. ते छोटंसं झाड मी खिडकीवर सजवून ठेवायचे. ते हि कापूस किवा घरी सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंनी. तेव्हा सजावटीसाठी खास खर्च करणं माझ्या पौकेटमनीला परवडणार नव्हतं. पण तरीही ख्रिसमस च्या दिवसात ते आजूबाजूला असणं हीच पुरेशी गोष्ट होती माझ्यासाठी. हळूहळू त्या...