Posts

Showing posts from 2012

खाद्यसंस्कृती टिव्हीतली

जेवण हा माझा इतका जिव्हाळ्याचा विषय आहे कि या विषयावर मी कितीहि वेळ बोलू शकते. असं म्हणतात कि आपली भारतीय खाद्यसंस्कृती फार महान आहे...नाही आहेच ती पण जागतिक खाद्यसंस्कृतीही आता दुर्लक्ष करण्यासारखी राहिलेली नाही. परिपूर्ण जेवण कसं असावं हे  जगाने भारतीयांकडून शिकावं अन Presentation  कसं असावं हे आपण त्यांच्याकडून शिकायला हवं. असं म्हणतात कि जेवणाने आधी डोळे तृप्त झाले पाहिजेत अन नंतर पोट. हाच तर ग्लोबल खाद्यसंस्कृती चा मूलमंत्र आहे. जेव्हा पासून कुकरी शोज टेलीव्हीजनवर  यायला लागले, तेव्हापासून जागतिक खाद्यसंस्कृती अजून विकसित झाली. नाहीतर फॉरेनच्या भाज्या कुठे मिळत होत्या इथे...आणि मिळत असल्याच तरी क्वचित ठिकाणी. आजकाल प्रत्तेक गल्लीच्या टोकावर चेरी टोम्याटोज, ब्रोकोली, अवोकाडो सर्रास  दिसतात. इम्पोर्टेड भाज्यांसाठी आजकाल विशेष दुकानही सुरु झाली आहेत, विशेषकरून Malls मध्ये.  मागे एकदा Food Mall मधून मी २ भली मोठी लिंब आणली होती अन तीसुद्धा सीडलेस.. आपल्या ३ लिंबांच्या बरोबरीचं...

Nothing

वेळ कुणासाठीही थांबत नाही, ना तुमच्यासाठी ना माझ्यासाठी. दिवसामागून दिवस निघून जातात, वर्षामागून वर्ष.. पण काही आठवणी मनात कायमच्या कोरलेल्या असतात. काळाबरोबर तुम्ही पुढे निघून जाता तुमच्या प्रियजनांबरोबर.. तुमचं आयुष्य बदलतं, मित्रमंडळी बदलतात, आजूबाजूचं  जगही बदलतं पण मनात कोरलेल्या त्या काही आठवणी तशाच असतात, तुम्हाला हव्या असल्यातरी किंवा नको असल्या तरीही,  ज्या आनंदाच्या क्षणी दुख देवून जातात आणि दुखाच्या क्षणी आनंद... कधीतरी अचानक त्या आठवणी मनात दाटून येतात अन चेहऱ्यावर एक गोड हास्याची लकीर देवून जातात...आणि कोणी जर त्या हसण्या मागचं कारण विचारलं तर तुम्ही फक्त एवढंच म्हणता "Nothing"

मैत्री

मैत्री असावी फुलांसारखी काट्यांवर राहूनही सुगंध देणारी.. मैत्री असावी पाण्यासारखी दुसऱ्याच्या रंगात सहज मिसळणारी.. मैत्री असावी इंद्रधनुष्यासारखी आकाशात राहूनही जमिनीशी नाते जोडणारी.. मैत्री असावी वाऱ्यासारखी दिसत नसली तरी अवतीभवती जाणवणारी.. मैत्री असावी लाटेसारखी अवखळ पण सतत किनाऱ्याला सोबत करणारी.. मैत्री असावी काजव्यासारखी अंधारातही प्रकाश देणारी.. मैत्री असावी झरयासारखी अखंड वाहत राहणारी.. मैत्री नसावी काचेसारखी ठेच लागताच विखरून जाणारी..