मैत्री

मैत्री असावी फुलांसारखी
काट्यांवर राहूनही सुगंध देणारी..

मैत्री असावी पाण्यासारखी
दुसऱ्याच्या रंगात सहज मिसळणारी..

मैत्री असावी इंद्रधनुष्यासारखी
आकाशात राहूनही जमिनीशी नाते जोडणारी..

मैत्री असावी वाऱ्यासारखी
दिसत नसली तरी अवतीभवती जाणवणारी..

मैत्री असावी लाटेसारखी
अवखळ पण सतत किनाऱ्याला सोबत करणारी..

मैत्री असावी काजव्यासारखी
अंधारातही प्रकाश देणारी..

मैत्री असावी झरयासारखी
अखंड वाहत राहणारी..

मैत्री नसावी काचेसारखी
ठेच लागताच विखरून जाणारी.. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कसं जगायचं?

Nothing