कसं जगायचं?

आयुष्य जगणं हि एक कला आहे,
कसं जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं..

दुख सगळ्यांनाच असतात,
दुखाला हसत जगायचं कि दुखात पिचत जगायचं
हे ज्याचं त्याने ठरवायचं..

उद्याच्या चिंता सगळ्यांनाच असतात
पण उद्याची शाश्वती कोणालाच नसते,
उद्यासाठी आज मरायचं कि आजच्या दिवसात संपूर्ण आयुष्य जगायचं
हे ज्याचं त्याने ठरवायचं..

समाजात जर आपलं अस्तित्व टिकवायच असेल तर स्पर्धा अटळ आहे,
पण हि स्पर्धा दुसर्याशी आहे कि स्वताची स्वताशी
हे ज्याचं त्याने ठरवायचं..

समाज हा दुसर्याची निंदा करण्यासाठीच असतो,
कोणासाठी जगायचं? स्वतासाठी कि समाजासाठी
हे ज्याचं त्याने ठरवायचं..

आयुष्यात सुखाचेही चार क्षण येतात,
टिचभर सुखात सुख मानायचं कि सुख वाटून वाढवायचं
हे ज्याचं त्याने ठरवायचं..

कोणाच्यातरी आदर्शांवर जगायचं कि स्वताचा आदर्श सोडून जायचं
हे ज्याचं त्याने ठरवायचं..

प्रत्तेक सामान्य माणसात काहीतरी असामान्य गोष्ट असतेच,
सामान्य म्हणून जगायचं कि असामान्य म्हणून
हे ज्याचं त्याने ठरवायचं..

प्रत्तेक दिवस एक संघर्ष आहे आणि जीवन एक लढाई
जिंकून मरायचं कि हरत जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं

जगण्यासाठी किडे-मुंग्याही जगतात हो
सावज म्हणून जगायचं कि शिकारी म्हणून
हे ज्याचं त्याने ठरवायचं..

शीतल

Comments

Popular posts from this blog

मैत्री

Nothing