Posts

आंबट गोड

काल नेटवर सर्फ करताना वाचनात "मेथांबा" ची रेसीपी आली. ऐकून माहित होती पण करण्याचा योग कधी आला नव्हता. मेथांबा म्हणजे शिजवलेल्या कैरीचा आंबट गोड पदार्थ! (खूप कमी लोकांना माहित असेल कदाचित, आजकालच्या पिझ्झा बर्गर च्या जमान्यात बऱ्याच जुन्या रेसिपीज पडद्या आड गेल्या आहेत. असो! तो एक स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे) तर आणल्या कैऱ्या आणि लागले कामाला. सरप्रायजींगली उत्तम झाला होता मेथांबा(नेटवर सापडलेल्या सगळ्याच रेसिपीज छान होतात असं नाही). कैरीचा आंबटपणा, गुळाचा गोडवा आणि मेथीची मंद सुवासिक चव…  एकंदर उत्तम रसायन जमलं होतं. किती रूपं त्या कैरीची? किती प्रकारे खाण्यात तिचा उपयोग केला जाऊ शकतो… आणि प्रत्तेक रुपात ती stand out होते. कैरीचं लोणचं असो वा कैरीची चटणी. कैरी प्रत्तेक रुपात हिट असते. चैत्रामध्ये तर कैरी ला विशेष मान असतो. आंबा डाळ आणि कैरीचं पन्ह हा चैत्रातील हळदी कुंकवाचा ठरलेला मेन्यू! कैरीचा मोरांबा तर लहानानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच वेड लावतो. आमच्याकडे तर नॉनव्हेज मध्येहि आम्ही कैरीचा वापर करतो. बाजाराचं कालवण असो वा...

उन्हाळ्याची सूट्टी

एप्रिल महिना सुरु झाला कि चाहूल लागते ती वार्षिक परीक्षेची आणि त्यानंतर येणारी ती जादुई उन्हाळ्याची सूट्टी! आता त्या सुट्ट्यांची जागा सीक लीव्ह, पेड लीव्ह, Annual लीव्ह ने जरी घेतली असली तरी त्याला शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची सर नाही. ते दिवसच काही और होते. प्रत्येकाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या व्याख्या वेगळ्या होत्या. कोणासाठी सुट्टी म्हणजे मामाच्या गावाला जाणं, कोणासाठी मनसोक्त खेळणं, कोणासाठी नाचाचे/गाण्याचे क्लासेस करणं तर कोणासाठी नाटक/सिनेमे पाहणं. माझ्यासाठीं सुट्टी म्हणजें फक्त आणि फक्त गोष्टीची पुस्तकं! कधी एकदाची परीक्षा संपतेय आणि मी माझं पुस्तकांचं गाठोडं सोडतेय असं मला व्हायचं. नवीन पुस्तकं तर घ्यायचीच त्याच बरोबर जुनी पुस्तकं परत वाचून काढायची हेच माझे सुट्टीतले उद्योग. बाल-साहित्यातलं एकही पुस्तक मी शिल्लक ठेवलं नसेल. चिंगी, गोट्या, श्यामची आई, अकबर बिरबल, सिंदबादच्या सात सफरी, अलिबाबा चाळीस चोर, अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा, इसापनीती, पंचतंत्र, गुलबकावली, ग्रीमच्या परीकथा, चांदोबा, चंपक, ठकठक, विक्रम वेताळ, अरेबिअन नाईट्स, सिंहासन बत्तीशी, हितोपदेश, अलि...

आनंदाचं झाड

दिवाळी झाली कि चाहूल लागते ती ख्रिसमसची. ख्रिसमस म्हणजे नवीन वर्षाची चाहूल अन नवं वर्ष म्हणजे पुन्हा सगळ्या सणांची नांदी. ग्लोबलायझेशनला सणवारही अपवाद राहिलेले नाहीत ते हि आजकाल ग्लोबल झालेत. आनंद साजरा करायला माणसाला आजकाल कुठलही निमित्त पुरतं मग ते जोशी आणि दांडेकरांनी आणलेला ख्रिसमस ट्री असो वा खानांनी आणलेला गणपती. आनंद हा फक्त आनंद असतो. असो! तर हे ख्रिसमस ट्री ... नाही.. आनंदाचं झाड आमच्याकडे हळूहळू कसं रुजत गेलं ते कळलंच नाही. लहान असताना ख्रिसमस ट्री फक्त मी चर्चमध्ये किवा क्रिश्चन लोकांच्या घरी पहिले होते. ते इतके देखणे दिसायचे कि ते आपल्याघरीहि असावे असं मनापासून वाटायचं. म्हणूनच शाळेत असताना बोट भर लांबीचे चकचकीत ख्रिसमस ट्री मी दर ख्रिसमसला शोकेसमध्ये आणून ठेवायचे नंतर पुढे कॉलेज मध्ये असताना त्याची लांबी अर्धा फुटांवर गेली. ते छोटंसं झाड मी खिडकीवर सजवून ठेवायचे. ते हि कापूस किवा घरी सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंनी. तेव्हा सजावटीसाठी खास खर्च करणं माझ्या पौकेटमनीला परवडणार नव्हतं. पण तरीही ख्रिसमस च्या दिवसात ते आजूबाजूला असणं हीच पुरेशी गोष्ट होती माझ्यासाठी. हळूहळू त्या...

योगा योग!

व्यायाम हि गोष्ट आळशी लोकांसाठी बनलेली नाही. मुळात करावाच कशाला तो व्यायाम! ऑफिस मध्ये काम करताना, ट्रेन ने प्रवास करताना, बस पकडताना, स्टेशन वरचे ब्रिज चढताना उतरताना कमी का होतो व्यायाम. मग कशाला हलवा ते हात पाय उगाचच? छे छे तो आपला प्रांत नाही!  कधी तरी uneasy वाटलं तर शतपावली करण्यापर्यंत ती आमची मजल...त्या पलीकडे जावून माझा कधी "योगाशी"  संबंध येईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. माझ्या एका मैत्रिणी ने योगाचे क्लासेस केले होते. तेव्हा पासून ती मागे लागली होती तूही कर तूलाही छान वाटेल. फार हातपाय मारायला नाही लागत बसल्या बसल्याहि तू करू शकतेस.. वगैरे वगैरे पण आवडच नसल्यामुळे सवड काढण्याचा प्रश्नच नव्हता. वर्षातून एकदा ते क्लासेस आमच्या इथे होतात. दुसर्या वर्षीही जेव्हा त्या क्लासेस ची जाहिरात आली, madam  पुन्हा मागे लागल्या..हवं तर मी तुझे पैसे भरते..वाढदिवसाचं गिफ्ट समज वगैरे वगैरे .....आता आढेवेढे घेवून ती ऐकणारी नव्हती म्हणून या वेळी हि भानगड काय आहे ते म्हटलं पाहूनच यावं एकदा. जीवावर उदार होवून सकाळी ७.३० च सेशन अटेंड करायचं ठरवलं. रविवारची सकाळ होती ख...

खाद्यसंस्कृती टिव्हीतली

जेवण हा माझा इतका जिव्हाळ्याचा विषय आहे कि या विषयावर मी कितीहि वेळ बोलू शकते. असं म्हणतात कि आपली भारतीय खाद्यसंस्कृती फार महान आहे...नाही आहेच ती पण जागतिक खाद्यसंस्कृतीही आता दुर्लक्ष करण्यासारखी राहिलेली नाही. परिपूर्ण जेवण कसं असावं हे  जगाने भारतीयांकडून शिकावं अन Presentation  कसं असावं हे आपण त्यांच्याकडून शिकायला हवं. असं म्हणतात कि जेवणाने आधी डोळे तृप्त झाले पाहिजेत अन नंतर पोट. हाच तर ग्लोबल खाद्यसंस्कृती चा मूलमंत्र आहे. जेव्हा पासून कुकरी शोज टेलीव्हीजनवर  यायला लागले, तेव्हापासून जागतिक खाद्यसंस्कृती अजून विकसित झाली. नाहीतर फॉरेनच्या भाज्या कुठे मिळत होत्या इथे...आणि मिळत असल्याच तरी क्वचित ठिकाणी. आजकाल प्रत्तेक गल्लीच्या टोकावर चेरी टोम्याटोज, ब्रोकोली, अवोकाडो सर्रास  दिसतात. इम्पोर्टेड भाज्यांसाठी आजकाल विशेष दुकानही सुरु झाली आहेत, विशेषकरून Malls मध्ये.  मागे एकदा Food Mall मधून मी २ भली मोठी लिंब आणली होती अन तीसुद्धा सीडलेस.. आपल्या ३ लिंबांच्या बरोबरीचं...

Nothing

वेळ कुणासाठीही थांबत नाही, ना तुमच्यासाठी ना माझ्यासाठी. दिवसामागून दिवस निघून जातात, वर्षामागून वर्ष.. पण काही आठवणी मनात कायमच्या कोरलेल्या असतात. काळाबरोबर तुम्ही पुढे निघून जाता तुमच्या प्रियजनांबरोबर.. तुमचं आयुष्य बदलतं, मित्रमंडळी बदलतात, आजूबाजूचं  जगही बदलतं पण मनात कोरलेल्या त्या काही आठवणी तशाच असतात, तुम्हाला हव्या असल्यातरी किंवा नको असल्या तरीही,  ज्या आनंदाच्या क्षणी दुख देवून जातात आणि दुखाच्या क्षणी आनंद... कधीतरी अचानक त्या आठवणी मनात दाटून येतात अन चेहऱ्यावर एक गोड हास्याची लकीर देवून जातात...आणि कोणी जर त्या हसण्या मागचं कारण विचारलं तर तुम्ही फक्त एवढंच म्हणता "Nothing"

मैत्री

मैत्री असावी फुलांसारखी काट्यांवर राहूनही सुगंध देणारी.. मैत्री असावी पाण्यासारखी दुसऱ्याच्या रंगात सहज मिसळणारी.. मैत्री असावी इंद्रधनुष्यासारखी आकाशात राहूनही जमिनीशी नाते जोडणारी.. मैत्री असावी वाऱ्यासारखी दिसत नसली तरी अवतीभवती जाणवणारी.. मैत्री असावी लाटेसारखी अवखळ पण सतत किनाऱ्याला सोबत करणारी.. मैत्री असावी काजव्यासारखी अंधारातही प्रकाश देणारी.. मैत्री असावी झरयासारखी अखंड वाहत राहणारी.. मैत्री नसावी काचेसारखी ठेच लागताच विखरून जाणारी..