आंबट गोड
काल नेटवर सर्फ करताना वाचनात "मेथांबा" ची रेसीपी आली. ऐकून माहित होती पण करण्याचा योग कधी आला नव्हता. मेथांबा म्हणजे शिजवलेल्या कैरीचा आंबट गोड पदार्थ! (खूप कमी लोकांना माहित असेल कदाचित, आजकालच्या पिझ्झा बर्गर च्या जमान्यात बऱ्याच जुन्या रेसिपीज पडद्या आड गेल्या आहेत. असो! तो एक स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे) तर आणल्या कैऱ्या आणि लागले कामाला. सरप्रायजींगली उत्तम झाला होता मेथांबा(नेटवर सापडलेल्या सगळ्याच रेसिपीज छान होतात असं नाही). कैरीचा आंबटपणा, गुळाचा गोडवा आणि मेथीची मंद सुवासिक चव… एकंदर उत्तम रसायन जमलं होतं.
किती रूपं त्या कैरीची? किती प्रकारे खाण्यात तिचा उपयोग केला जाऊ शकतो… आणि प्रत्तेक रुपात ती stand out होते. कैरीचं लोणचं असो वा कैरीची चटणी. कैरी प्रत्तेक रुपात हिट असते. चैत्रामध्ये तर कैरी ला विशेष मान असतो. आंबा डाळ आणि कैरीचं पन्ह हा चैत्रातील हळदी कुंकवाचा ठरलेला मेन्यू! कैरीचा मोरांबा तर लहानानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच वेड लावतो. आमच्याकडे तर नॉनव्हेज मध्येहि आम्ही कैरीचा वापर करतो. बाजाराचं कालवण असो वा ओला जवळा. कैरी त्याला चार चांद लावते. डाळीमध्ये जर चिंच/कोकम च्या ऐवजी कैरी घातली तर डाळीला उत्तम चव येते. कैरीची आमटी, कैरीचा भात एक ना हजार प्रकार. साऊथ इंडियन लोकं रसम आणि सांबार मध्ये कैरीचा वापर करतात. कैरीची पावडर-आमचूर पावडर पासून होणाऱ्या पदार्थांची तर स्वतंत्र लीस्ट बनेल. भेळ आणि शेवबटाटापूरी वर घातलेली कैरी तर आठवत असेलच? भारतातील प्रत्तेक राज्यात कैरीशी निगडीत एक तरी रेसिपी नक्कीच असेल. गावाकडे लोकप्रिय असलेला कैरीचा ठेचा त्याला कसं विसरता येईल? भारतात अगदीच कॉमनली वापरली जाणारी कैरी आजकाल परदेशी खाण्यातही दिसू लागली आहे. सलाड, सालसा, सरबतांमध्ये तिचा उपयोग होऊ लागला आहे.
कच्च्या कैरीचे हे अनंत प्रकार तर आंबा या विषयावर तर PHD होईल. कैरी कुठल्याही रंगात आणि कुठल्याही ढंगात उत्तमच लागते आणि कुठलाही प्रकार येत नसेल तर not to worry मीठ मसाला हाणा त्यावर आणि मारा ताव!

Comments
Post a Comment