Posts

Showing posts from December, 2011

ती आई असते..

तुमच्या अस्तित्वाचा जी भक्कम पाया असते, ती आई असते.. सावली सारखी जी सतत तुमच्या पाठीशी असते, ती आई असते.. स्वताची हौस मारून जी तुमची हौस पुरवते, ती आई असते.. कुठलीही अपेक्षा न ठेवता जी तुम्हाला मदत करते, ती आई असते.. दुखात तुम्हाला जी पहिली सोबत करते, ती आई असते.. तुमच्या आनंदात जी स्वताचे सुख मानते, ती आई असते.. तुमची प्रत्तेक चूक पोटात घालते, ती आई असते.. ठेच लागल्यावर जी पहिली हाक असते, ती आई असते.. चंदनासारखी झिजून तुम्हाला ताठ मानेने जगायला शिकवते, ती आई असते.. तिचा आदर करा... कारण बाजारात कदाचित नातेवाईक विकत मिळतीलही पण आई नाही.

Mad Angle

त्याच्यासाठी आज खूप महत्वाचा दिवस होता. गोष्टच अशी होती. आज त्याच लग्न होतं! आईवडिलांचं घर सोडून आज तो सासरी जाणार होता. आई वडिलांचा एकुलता एक, लाडाकोडात वाढलेला.. त्याचं घर म्हणजे त्याचं विश्व होतं. त्याच विश्वाचा आज त्याला रामराम घ्यायचा होता. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आदल्या रात्री सामान pack करताना त्याला ब्रम्हांड आठवलं होतं.  जितकं शक्य होतं ते सामान त्याने ब्यागेत भरून घेतलं होतं पण आठ्वणींच काय? त्या भिंती.. ज्यावर त्याने लहानपणी A  B C D  लिहिलं होतं, तो बेड जो फक्त त्याचा आणि त्याचाच होता, ती भिंतीवरची फोटोफ्रेम ज्यावर त्यांचा family photo होता आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे त्याचे आई-बाबा. जे त्यासाठी दैवत होते. आज सगळच त्याला पारखं होणार होतं कारण आज त्याचं लग्न होतं आणि तो सासरी जाणार होता. जुन्या आठवणी मनात दडवून नवीन आयुष्याची स्वप्नं घेवून त्याने सासरी गृहप्रवेश केला. एका नवख्या घराला त्याला आता आपलं घर मानायचं होतं. बायकोच्या आई वडिलांना प्रेमाने आई बाबा म्हणायचं होतं. काम तसं अवघडच होतं! लग्नाचे नव्या नवलाईचे दिवस आता संपले होते आणि वास्तवाला सुरु...

त्यांच प्रेम

प्रेम म्हणजे प्रेम असतं त्याचं तिचं कधीच सेम नसतं प्रेम म्हणजे तिच्यासाठी पूजा असते त्याला मात्र प्रसादातच रस असतो प्रेम म्हणजे तिच्यासाठी काळजी असते त्याच्यासाठी मात्र ती डोकेदुखी असते प्रेम शब्दात व्यक्त करायला तिला कधी जमतच नाही नजरेतल्या भावना त्याला कधी दिसतच नाही तिचं नटणं सजणं सगळं त्याच्यासाठीच असतं तिला एक नजर पहायला त्याच्याकडे वेळच नसतो प्रेम म्हणजे त्याच्यासाठी भेटवस्तू देणं असतं तिच्यासाठी मात्र त्याचं जवळ असणंच पुरेसं असतं प्रेम म्हणजे तिच्यासाठी पावसात चिंब भिजणं असतं त्याच्यासाठी मात्र ते आजारपणाला आमंत्रण असतं म्हणूनच म्हणते, प्रेम म्हणजे प्रेम असतं त्याचं तिचं कधीच सेम नसतं