त्यांच प्रेम
प्रेम म्हणजे प्रेम असतं
त्याचं तिचं कधीच सेम नसतं
प्रेम म्हणजे तिच्यासाठी पूजा असते
त्याला मात्र प्रसादातच रस असतो
प्रेम म्हणजे तिच्यासाठी काळजी असते
त्याच्यासाठी मात्र ती डोकेदुखी असते
प्रेम शब्दात व्यक्त करायला तिला कधी जमतच नाही
नजरेतल्या भावना त्याला कधी दिसतच नाही
तिचं नटणं सजणं सगळं त्याच्यासाठीच असतं
तिला एक नजर पहायला त्याच्याकडे वेळच नसतो
प्रेम म्हणजे त्याच्यासाठी भेटवस्तू देणं असतं
तिच्यासाठी मात्र त्याचं जवळ असणंच पुरेसं असतं
प्रेम म्हणजे तिच्यासाठी पावसात चिंब भिजणं असतं
त्याच्यासाठी मात्र ते आजारपणाला आमंत्रण असतं
म्हणूनच म्हणते,

Comments
Post a Comment