ती आई असते..

तुमच्या अस्तित्वाचा जी भक्कम पाया असते,
ती आई असते..

सावली सारखी जी सतत तुमच्या पाठीशी असते,
ती आई असते..

स्वताची हौस मारून जी तुमची हौस पुरवते,
ती आई असते..

कुठलीही अपेक्षा न ठेवता जी तुम्हाला मदत करते,
ती आई असते..

दुखात तुम्हाला जी पहिली सोबत करते,
ती आई असते..

तुमच्या आनंदात जी स्वताचे सुख मानते,
ती आई असते..

तुमची प्रत्तेक चूक पोटात घालते,
ती आई असते..

ठेच लागल्यावर जी पहिली हाक असते,
ती आई असते..

चंदनासारखी झिजून तुम्हाला ताठ मानेने जगायला शिकवते,
ती आई असते..

तिचा आदर करा...
कारण बाजारात कदाचित नातेवाईक विकत मिळतीलही पण आई नाही.

Comments

Popular posts from this blog

कसं जगायचं?

मैत्री

Nothing