Nothing

वेळ कुणासाठीही थांबत नाही,
ना तुमच्यासाठी ना माझ्यासाठी.

दिवसामागून दिवस निघून जातात, वर्षामागून वर्ष..
पण काही आठवणी मनात कायमच्या कोरलेल्या असतात.

काळाबरोबर तुम्ही पुढे निघून जाता तुमच्या प्रियजनांबरोबर..

तुमचं आयुष्य बदलतं, मित्रमंडळी बदलतात, आजूबाजूचं  जगही बदलतं

पण मनात कोरलेल्या त्या काही आठवणी तशाच असतात, तुम्हाला हव्या असल्यातरी किंवा नको असल्या तरीही,  ज्या आनंदाच्या क्षणी दुख देवून जातात आणि दुखाच्या क्षणी आनंद...

कधीतरी अचानक त्या आठवणी मनात दाटून येतात अन चेहऱ्यावर एक गोड हास्याची लकीर देवून जातात...आणि कोणी जर त्या हसण्या मागचं कारण विचारलं तर तुम्ही फक्त एवढंच म्हणता "Nothing"

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कसं जगायचं?

मैत्री