Posts

Showing posts with the label Marathi poem

मैत्री

मैत्री असावी फुलांसारखी काट्यांवर राहूनही सुगंध देणारी.. मैत्री असावी पाण्यासारखी दुसऱ्याच्या रंगात सहज मिसळणारी.. मैत्री असावी इंद्रधनुष्यासारखी आकाशात राहूनही जमिनीशी नाते जोडणारी.. मैत्री असावी वाऱ्यासारखी दिसत नसली तरी अवतीभवती जाणवणारी.. मैत्री असावी लाटेसारखी अवखळ पण सतत किनाऱ्याला सोबत करणारी.. मैत्री असावी काजव्यासारखी अंधारातही प्रकाश देणारी.. मैत्री असावी झरयासारखी अखंड वाहत राहणारी.. मैत्री नसावी काचेसारखी ठेच लागताच विखरून जाणारी.. 

ती आई असते..

तुमच्या अस्तित्वाचा जी भक्कम पाया असते, ती आई असते.. सावली सारखी जी सतत तुमच्या पाठीशी असते, ती आई असते.. स्वताची हौस मारून जी तुमची हौस पुरवते, ती आई असते.. कुठलीही अपेक्षा न ठेवता जी तुम्हाला मदत करते, ती आई असते.. दुखात तुम्हाला जी पहिली सोबत करते, ती आई असते.. तुमच्या आनंदात जी स्वताचे सुख मानते, ती आई असते.. तुमची प्रत्तेक चूक पोटात घालते, ती आई असते.. ठेच लागल्यावर जी पहिली हाक असते, ती आई असते.. चंदनासारखी झिजून तुम्हाला ताठ मानेने जगायला शिकवते, ती आई असते.. तिचा आदर करा... कारण बाजारात कदाचित नातेवाईक विकत मिळतीलही पण आई नाही.

त्यांच प्रेम

प्रेम म्हणजे प्रेम असतं त्याचं तिचं कधीच सेम नसतं प्रेम म्हणजे तिच्यासाठी पूजा असते त्याला मात्र प्रसादातच रस असतो प्रेम म्हणजे तिच्यासाठी काळजी असते त्याच्यासाठी मात्र ती डोकेदुखी असते प्रेम शब्दात व्यक्त करायला तिला कधी जमतच नाही नजरेतल्या भावना त्याला कधी दिसतच नाही तिचं नटणं सजणं सगळं त्याच्यासाठीच असतं तिला एक नजर पहायला त्याच्याकडे वेळच नसतो प्रेम म्हणजे त्याच्यासाठी भेटवस्तू देणं असतं तिच्यासाठी मात्र त्याचं जवळ असणंच पुरेसं असतं प्रेम म्हणजे तिच्यासाठी पावसात चिंब भिजणं असतं त्याच्यासाठी मात्र ते आजारपणाला आमंत्रण असतं म्हणूनच म्हणते, प्रेम म्हणजे प्रेम असतं त्याचं तिचं कधीच सेम नसतं

कसं जगायचं?

आयुष्य जगणं हि एक कला आहे, कसं जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. दुख सगळ्यांनाच असतात, दुखाला हसत जगायचं कि दुखात पिचत जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. उद्याच्या चिंता सगळ्यांनाच असतात पण उद्याची शाश्वती कोणालाच नसते, उद्यासाठी आज मरायचं कि आजच्या दिवसात संपूर्ण आयुष्य जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. समाजात जर आपलं अस्तित्व टिकवायच असेल तर स्पर्धा अटळ आहे, पण हि स्पर्धा दुसर्याशी आहे कि स्वताची स्वताशी हे ज्याचं त्याने ठरवायचं.. समाज हा दुसर्याची निंदा करण्यासाठीच असतो, कोणासाठी जगायचं? स्वतासाठी कि समाजासाठी हे ज्याचं त्याने ठरवायचं.. आयुष्यात सुखाचेही चार क्षण येतात, टिचभर सुखात सुख मानायचं कि सुख वाटून वाढवायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. कोणाच्यातरी आदर्शांवर जगायचं कि स्वताचा आदर्श सोडून जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. प्रत्तेक सामान्य माणसात काहीतरी असामान्य गोष्ट असतेच, सामान्य म्हणून जगायचं कि असामान्य म्हणून हे ज्याचं त्याने ठरवायचं.. प्रत्तेक दिवस एक संघर्ष आहे आणि जीवन एक लढाई जिंकून मरायचं कि हरत जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं जगण्यासाठ...