Posts

Showing posts from 2011

ती आई असते..

तुमच्या अस्तित्वाचा जी भक्कम पाया असते, ती आई असते.. सावली सारखी जी सतत तुमच्या पाठीशी असते, ती आई असते.. स्वताची हौस मारून जी तुमची हौस पुरवते, ती आई असते.. कुठलीही अपेक्षा न ठेवता जी तुम्हाला मदत करते, ती आई असते.. दुखात तुम्हाला जी पहिली सोबत करते, ती आई असते.. तुमच्या आनंदात जी स्वताचे सुख मानते, ती आई असते.. तुमची प्रत्तेक चूक पोटात घालते, ती आई असते.. ठेच लागल्यावर जी पहिली हाक असते, ती आई असते.. चंदनासारखी झिजून तुम्हाला ताठ मानेने जगायला शिकवते, ती आई असते.. तिचा आदर करा... कारण बाजारात कदाचित नातेवाईक विकत मिळतीलही पण आई नाही.

Mad Angle

त्याच्यासाठी आज खूप महत्वाचा दिवस होता. गोष्टच अशी होती. आज त्याच लग्न होतं! आईवडिलांचं घर सोडून आज तो सासरी जाणार होता. आई वडिलांचा एकुलता एक, लाडाकोडात वाढलेला.. त्याचं घर म्हणजे त्याचं विश्व होतं. त्याच विश्वाचा आज त्याला रामराम घ्यायचा होता. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आदल्या रात्री सामान pack करताना त्याला ब्रम्हांड आठवलं होतं.  जितकं शक्य होतं ते सामान त्याने ब्यागेत भरून घेतलं होतं पण आठ्वणींच काय? त्या भिंती.. ज्यावर त्याने लहानपणी A  B C D  लिहिलं होतं, तो बेड जो फक्त त्याचा आणि त्याचाच होता, ती भिंतीवरची फोटोफ्रेम ज्यावर त्यांचा family photo होता आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे त्याचे आई-बाबा. जे त्यासाठी दैवत होते. आज सगळच त्याला पारखं होणार होतं कारण आज त्याचं लग्न होतं आणि तो सासरी जाणार होता. जुन्या आठवणी मनात दडवून नवीन आयुष्याची स्वप्नं घेवून त्याने सासरी गृहप्रवेश केला. एका नवख्या घराला त्याला आता आपलं घर मानायचं होतं. बायकोच्या आई वडिलांना प्रेमाने आई बाबा म्हणायचं होतं. काम तसं अवघडच होतं! लग्नाचे नव्या नवलाईचे दिवस आता संपले होते आणि वास्तवाला सुरु...

त्यांच प्रेम

प्रेम म्हणजे प्रेम असतं त्याचं तिचं कधीच सेम नसतं प्रेम म्हणजे तिच्यासाठी पूजा असते त्याला मात्र प्रसादातच रस असतो प्रेम म्हणजे तिच्यासाठी काळजी असते त्याच्यासाठी मात्र ती डोकेदुखी असते प्रेम शब्दात व्यक्त करायला तिला कधी जमतच नाही नजरेतल्या भावना त्याला कधी दिसतच नाही तिचं नटणं सजणं सगळं त्याच्यासाठीच असतं तिला एक नजर पहायला त्याच्याकडे वेळच नसतो प्रेम म्हणजे त्याच्यासाठी भेटवस्तू देणं असतं तिच्यासाठी मात्र त्याचं जवळ असणंच पुरेसं असतं प्रेम म्हणजे तिच्यासाठी पावसात चिंब भिजणं असतं त्याच्यासाठी मात्र ते आजारपणाला आमंत्रण असतं म्हणूनच म्हणते, प्रेम म्हणजे प्रेम असतं त्याचं तिचं कधीच सेम नसतं

कसं जगायचं?

आयुष्य जगणं हि एक कला आहे, कसं जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. दुख सगळ्यांनाच असतात, दुखाला हसत जगायचं कि दुखात पिचत जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. उद्याच्या चिंता सगळ्यांनाच असतात पण उद्याची शाश्वती कोणालाच नसते, उद्यासाठी आज मरायचं कि आजच्या दिवसात संपूर्ण आयुष्य जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. समाजात जर आपलं अस्तित्व टिकवायच असेल तर स्पर्धा अटळ आहे, पण हि स्पर्धा दुसर्याशी आहे कि स्वताची स्वताशी हे ज्याचं त्याने ठरवायचं.. समाज हा दुसर्याची निंदा करण्यासाठीच असतो, कोणासाठी जगायचं? स्वतासाठी कि समाजासाठी हे ज्याचं त्याने ठरवायचं.. आयुष्यात सुखाचेही चार क्षण येतात, टिचभर सुखात सुख मानायचं कि सुख वाटून वाढवायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. कोणाच्यातरी आदर्शांवर जगायचं कि स्वताचा आदर्श सोडून जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.. प्रत्तेक सामान्य माणसात काहीतरी असामान्य गोष्ट असतेच, सामान्य म्हणून जगायचं कि असामान्य म्हणून हे ज्याचं त्याने ठरवायचं.. प्रत्तेक दिवस एक संघर्ष आहे आणि जीवन एक लढाई जिंकून मरायचं कि हरत जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं जगण्यासाठ...

देवांचा बाजार!

आज सकाळी सकाळी mailbox मध्ये साईबाबा अवतरले होते. शिर्डी पाहिली नसल्यामुळे मोठ्या कुतूहलाने मी ते इमेल उघडलं. छे!!!!! साईबाबा होते कुठे त्यात? सोन्या-चांदीचं प्रदर्शन होतं ते. अन त्या प्रदर्शनात केविलवाणी दिसणारी ती उत्सवमूर्ती जीला करोडो रुपयांचे सोन्याचे हार घातले होते. ज्या साईबाबांनी आपले जीवन लोकांच्या सेवेसाठी वेचले जे कायम फकिरासारखे राहिले त्यांना सोन्या-चांदीच अप्रूप ते काय असणार? ते जर आज असते तर त्यांनी नक्कीच हे सगळं गरीब लोकांमध्ये वाटून टाकलं असतं. सोनं चांदी देणाऱ्या आणि घेणार्यांना साईबाबा अजून कळलेच नाही हे साईबाबांचं दुर्दैव! नाही का? आजकाल देवस्थान हि फक्त श्रद्धास्थान राहिली नसून पैसे कमवायची नवीन साधनं बनली आहेत. या मे मध्ये आम्ही गोव्याला शांतादुर्गाला गेलो होतो. आम्ही घरून साग्रसंगीत साडी चोळीची ओटी घेतली होती. तिथे गेल्यावर पुजार्याने सांगितलं ५ नारळाचं तोरण द्यावं लागेल त्याचे पैसे counter वर भरून या. मंदिरा पासून नारळाचे stalls खूप दूर होते हे जेव्हा आम्ही पुजार्याच्या निदर्शनास आणून दिले तेव्हा त्याने तिथे असलेले लोकांचे आलेले नारळ एकत्र करून ओटीचा कार्यक्...

दिवाळी पहाट: काल आणि आज

हल्लीच वाचनात एक कविता आली "आता दिवाळी पहाट पूर्वी सारखी रंगत नाही". खरच दिवाळी पहाट आता पूर्वी सारखी रंगत नाही. कितीही ओढून ताणून तो माहोल क्रिएट करायचा प्रयत्न केला तरी ती मजा आता नाही.... तसं बघायला गेलं तर पूर्वी पेक्षा झगमगाटाची, साज-सजावटीची साधनं जरी वाढली असली तरी त्या साधेपणामध्ये जी पारंपारिकता ठासून भरली होती ती आता नाही. पूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहिलं कोण उठणार यावरून आम्हा लहान मुलांमध्ये स्पर्धा लागलेली असायची. जो पहिला उठणार तो दुसऱ्याच्या दारात फटाक्याची माळ लावणार. पहाट उगवायची ती आमच्या दारात लावलेल्या फटाक्यांच्या आवाजानेच. बाहेर मिट्ट काळोख असायचा पण अक्खी गल्ली कंदिलाच्या प्रकाशात न्हाहून निघालेली असायची. दिवाळीची खरी मजा असायची ती सकाळी सकळी नवीन कपडे घालण्यात. तेव्हा फक्त वाढदिवस, दिवाळी, गणपतीलाच कपड्यांची खरेदी केली जायची. आता दर वीकेंडला Shopping केली जाते, कपड्यांची गरज असली नसली तरी. आता दिवाळी म्हणजे एक event असतो. ज्यात फक्त presentation महत्वाच असतं, खरी दिवाळी तर त्यातून कधीच हद्दपार झालेली असते. आता दिवाळी म्हणजे महागडे कपडे, विकतच...

गणपतींचे काही नवीन प्रकार

वेळ बदलली काळ बदलला तसे गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलले. १० वर्षांपूर्वीचे गणपती आणि आताचे गणपती यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. अर्थात गणपती नाही बदलले माणसं मात्र बदलली. माणसांनी गणेशोत्सवाचं स्वरूपही बदललं. पूर्वी दूरवर एखाद्या गल्लीत सार्वजनिक गणपती असायचा. आजकाल गल्लोगल्ली असतात. घरगुती गणपतीही आजच्या एवढे नक्कीच नव्हते. माझ्या पाहण्यात आलेले हे काही गणपतीचे विशेष प्रकार: १. पारंपारिक गणपती: वंश-परंपरेनुसार चालत आलेला हा गणपतीचा प्रकार. यामध्ये वडलोपार्जित गणपती पूजला जातो. इथे सजावटीला विशेष महत्व दिलं जात नाही मात्र गणपती घरी असेपर्यंत त्याची पूजाअर्चा विधिवत कशी होईल यावर जास्त भर दिला जातो. प्रसाद म्हणून जास्तीत जास्त लोक जेवून किवा तृप्त होवून कसे जातील यावर विशेष लक्ष दिलं जातं. २. पारंपारिक गणपती मध्यमवर्गीयांचे: यामध्ये सजावटीला विशेष महत्व दिलं जात. थर्माकोल, लाईट्स, फुलं decoration साठी वापरली जातात. पूजा १००% विधीवतच झाली पाहिजे असा यांचा अट्टाहास नसतो. आपल्याला जमेल, वेळ मिळेल तशी पूजा-अर्चा पाहिली जाते. घरी आलेल्या पाहुण्यांचे चहा, सरबत, चिवडा, लाडू वा इतर फराळ देव...

ऋषीची भाजी

अहो असे दचकू नका! मी काही इथे ऋषीच्या भाजीची रेसिपी पोस्ट करत नाहीय. नुकताच ऋषीपंचमीचा लेख वाचनात आला आणि ऋषीच्या भाजीची आठवण झाली. तसं ऋषीची भाजी करणं येरागबाळ्याच काम नाही. जे करत असतील त्यांना नक्कीच पटेल. बर्याच जणांना कदाचित माहितही नसेल ऋषीची भाजी म्हणजे काय? ब्रम्हदेवाने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली तेव्हा त्यांनी ७ ऋषी निर्माण केले वसिष्ठ, कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम आणि जमदग्नी. यांनाच सप्तर्षी म्हणून ओळखलं जात. यांच्यापासूनच पुढील पिढीची निर्मिती झाली. आपल्या घराण्याचे गोत्र सांगताना आपण ज्यांच नाव घेतो ते हेच आपल्या घराण्याचे मूळ पुरुष. ऋषीपंचमीच्या दिवशी याच ऋषींच स्मरण केलं जात. या दिवशी स्वकष्टाने निर्माण केलेलं म्हणजेच शेतीसाठी बैलांचा वापर न करता तयार झालेलं अन्न जसं कंदमूळ, रानपाला शिजवला जातो. त्यालाच ऋषीची भाजी असं म्हणतात. माझी ऋषीच्या भाजीशी ओळख झाली ती माझ्या आजीमुळे. भले घरी गणपती बसत नसले तरी ती भलं मोठं पातेलं भरून ऋषीची भाजी करायची. मग सगळ्या शेजाऱ्या-पाजाऱ्याना आणि आपल्या लेकींना ती भाजी पोहोचती करायची हा तीचा दरवर्षीचा परिपाठ असायचा. लहान...

ऋण गाण्याचे

काही वर्षांपूर्वी लोकसत्ताने एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. "ऋण गाण्याचे" हा निबंधाचा विषय होता. एखाद्या गाण्याने आपल्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल झाला असेल तर त्या विषयीचा आपला अनुभव त्यात लिहायचा होता. विषय खरच खूप छान आणि वेगळा होता. मलाही माझा अनुभव त्यात मांडायचा होता पण काही कारणांमुळे (माझ्या आळशीपणामुळे) ते राहून गेलं. मी तेव्हा SSC ला होते. फारशी स्कॉलर नव्हते पण ७०/७२% पर्यंत नक्कीच मजल मारायची. अन त्यात क्लास-बीस ला जाणं मला आवडायचं नाही. स्वताचा अभ्यास स्वतः करायचा. Final exam चे दिवस जवळ आले होते अन इतर मुलांप्रमाणे माझीही धडधड वाढायला लागली होती. एक तर बोर्डाची exam त्यात स्वताची शाळा सोडून दुसरीकडे जाउन पेपर लिहायचं टेन्शन. आजूबाजूच्या लोकांनी काहीतरी मोठा भयंकर इवेंट असल्या सारखी केलेली वातावरण निर्मिती त्यामुळे सॉलिड टेन्शन आलं होतं. नशीब त्यातल्या त्यात शाळा(सेंटर) तरी जवळ आणि चांगली आली होती. शेवटी तो दिवस उगवला ज्या दिवशी माझा पहिला पेपर होता. रात्री तर झोप आलीच नाही. घरच्यांच्या आणि देवाच्या पाया पडून मी परीक्षेला निघाले. एकटी कसली जातेय? सह...

आरक्षित सीट

आरक्षण हा आपल्या देशातला किती कळीचा मुद्दा आहे हे मला हल्लीच BEST मधे आलेल्या अनुभवावरून कळल. तरी बरं BEST ने बरयापैकी सीट्स आरक्षित ठेवल्या आहेत महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि अपंगांसाठी. जर प्रत्येकजण आप आपली जबाबदारी समजुन वागला तर आरक्षणाची गरजच नव्हती. असो, तर त्यादिवशी बस नेहमी प्रमाणे बर्यापैकी भरली होती. बसायला जागा नव्हती आणि standing बरच होतं. एवढ्यात पुढच्या साइडला जिथे अपन्गांची सीट असते तेथून भांडणाचा आवाज यायला सुरुवात झाली. त्या अपन्गांच्या आरक्षित सीट वर एक ज्येष्ठ नागरिक, एक अपंग व्यक्ति बसले होते अन पुढल्या स्टॉप वर एक अंध व्यक्ति चढली. त्यावरून त्यांच्यात वाद सुरु झाला की त्या अंध व्यक्तीला बसायला द्यायला सीट वरून उठणार कोण? खरं पहायला गेलं तर जे स्वताला ज्येष्ठ नागरिक म्हणवत होते ते सदगृहस्थ बर्यापैकी हट्टे कट्टे होते आणि सहज उभे राहू शकत होते, निव्वळ त्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकत्वाच आयकार्ड होतं म्हणून त्याना तिथून उठायचं नव्हतं. शेवटी कोणीच तिथून उठलं नाही आणि बाजुच्या सीट वरच्या एका युवकाने त्या अंध व्यक्तीला बसायला जागा दिली. कोण बरोबर किव्वा कोण वाईट य...